Thursday, September 13, 2012

उकल

                खूप दिवसांनी लिहायला आज बसलो खरा. पण पुन्हा सुरुवात कशी होईल याचा तणाव चेहऱ्यावर सतत जाणवत होता. लिहायला म्हटले कि खूप विचार करायचो असे कधी घडले नाही. जे मनात आले ते कागदावर उतरवत जायचे एवढेच येत असावे मला.विचारांना वाट करून देण्यासाठी लिखाण हा खरोखर चांगला प्रकार आहे. पण सर्वांच्या बाबतीत असे घडेल असे नाही. आणि मग सुरु होतो विचारांचे रणकंदन. आपण असेच का वागलो आणि असे का नाही घडले. हि नेहमीच न सुटणारी कोडी. ती सोडवण्याचा मग उगाच अट्टाहास सुरु होतो. आपण त्याच गोष्टींमध्ये इतके गुंततो कि आपल्याला आता त्यामधून बाहेर पडण्याचा मार्गाच दिसायचा बंद होतो. मग सुरु होतो प्रवास एका नकारार्थी. पण सगळे किती सहज शक्य होतो जर आपण आधीच हा गुंता सोडत गेलो तर. समस्या सोडवण्याचे तसे म्हटले दोन मार्ग. एक समस्या सोडवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करणे. अथवा तो प्रश्नावर विचार करणे सोडून देणे. वैचारिक गोष्टीवर दोन्ही गोष्टी समान वाटल्या तरी सामाजिक जीवनात इतके तटस्थ कधी रहाता येत नाही. म्हणूनच का होईना हे हेवेदावे हे प्रकार चालूच आहेत.
                 लहानपणी शाळेतून घरी येताना रस्त्यामध्ये खूप दुकाने होती. त्या दुकानासमोर पहिले की कित्येक आकर्षक गोष्टी मन विचलित करायच्या. वाटत राहायचे कि हि गोष्ट आपल्याला सुद्धा मिळावी. पण आर्थिक परिस्तिथी इतकी पण चांगली नव्हती. म्हणूनच का होईना आयुष्यातील चढउतार  चांगली पहिली होती.असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीचा प्रभाव खरोखरच खूप मोठा आहे हे नंतर नंतर जाणवू लागले.प्रश्न हा आहे कि आपण जसे जसे वाढत जातो तश्या आपल्या गरजा सुद्धा बदलत जातात.आता पहा ना, लहानपणी अनेक मुले आईस्क्रीम साठी हट्ट करतात. मग ती मोठी झाली तरी तसेच वागतात का? लहानपणाच्या सवयी तश्याच राहतात का? लहानपणी मुलांच्या पालकांसमोर  जबाबदारी  असतो तो त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याचा.  जबाबदारी  म्हणता येणार नाही पण प्रश्न म्हटले तरी चालेल. लहानपणी आईवदिलानाकडून सायकल मागणारा मुलगा जसा मोठा होतो तसे बाईक मागतो. म्हणजे काय तर साइकल  नंतर विसुरून जातो. तसेच असते आयुष्य सुद्धा. एखादी समस्या निपचित ठेवली ना तिची गरजच संपून जाते. म्हणजे एकच कि प्रश्न न मिटवताच तो सुटतो. 
                    आयुष्य देखील असेच असते जे आपण म्हणतो आपल्याला सर्वात प्रिय आहे अशीच गोष्ट आपल्याला नंतर नकोशी होते. काही नात्याचे देखील असेच होत असावे. नुसता मायेचा ओलावा निघून गेल्यावर फक्त सोपोस्कार म्हणून पाळले जातात. दिसत असते या नात्यांना आता काही अर्थ उरला नाही तरी देखील आपण ती नाती उगाच कुरवाळत बसतो.नातीगोती या गोष्टी खरे म्हटले तर सहवासावर अवलंबून आहेत असेच मला वाटते. उगाच दूर फेकलेल्या नात्यांचा आपण उदो उदो करत बसतो. मी खूप वेळा असे पहिले आहे कि तो माझा मित्र आहे जो आता मंत्री आहे , असे सांगणारे खूप लोके मला भेटली. त्यांच्या सोबन मी त्यांना भेटायला गेलो सुद्धा . पण त्या मित्रांचे वागणे मला चमत्कारीत वाटले. जुन्या आठवणी बोलून नुसते भागत नसते. त्यांच्या चेहऱ्यावरील तिटकाराचा भाव मला स्पस्ट दिसत होता. पण ते भाव त्यांना का नाही दिसले हे मात्र मला कळले नाही. कि त्यांच्या त्या गरीब मित्राने स्वताचा मोठेपणा दाखवण्याकरिता तो भाव दुर्लक्षित केला असावा. असो आपण काय करणार? प्रेमप्रकरणांचा देखील असाच प्रवास घडत असावा.                                          
                    विस्मरण हे खरे माणसाला मिळाले वरदान च म्हणावे लागेल. म्हणून च आपण प्रश्न च विसरतो. म्हणजे समस्या मितवन्याकरिता एक प्रश्न निपचित ठेवणे आणि त्यावर भाष्य न करणे हा पण एक समस्या सोडवण्याकरिता केलेला उपायच म्हणता येईल. प्रश्नांचे हे उकल शोधात आयुष्य निघून जाते. पण प्रश्न मात्र अधांतरीच पडून राहतो. 

Thursday, December 29, 2011

उपोषण

उपोषण म्हणजे नक्की काय याचा विचार करायला मला एकीने भाग पाडले. मग त्याबाबतचे अनेक विचार मनात घोंगावू लागले. नक्की हि भानगड आहे तरी काय? आपण अनेक ठिकाणी आमरण उपोषण असे फलक बघतो. तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नेहमीच पडत असावा . कि प्रकार आहे तरी काय? एखाद्याच्या विरोधात आपण जायचे आणि उपोषण करायचे , मग त्या माणसाला त्याचा काय फरक पडणार? उपाशी आपण राहायचे मग त्याला त्रास कसा होणार....लहान पणी तर या गोष्टीचा मला तिटकारा वाटायचा, अरे इंग्रजांच्या विरोधात या तत्वाचा वापर करून गांधी जिनी भारताला स्वातंत्र करायचा प्रयत्न केला...पण असे काय गोष्ट आहे ज्यामुळे या उपोषणाला इतकी प्रसिद्धी मिळते....खूप दिवस त्यामागची कारणे मला कळूच शकली नाही......
कोणत्याही क्रांतीची सुरुवात हि हिंसेने च होते असे माझे प्रांजळ मत होते...एखादा आपले ऐकत नाही आहे मग त्याच्या मुस्कटात मारली पाहिजे अश्या किंचित विचारांचा मी होतो. कुठे तरी काही करताना नुकसान तर होणारच पण ते भोगले पाहिजे असे माझे विचार होते..एखाद्याचे विचार खोलवर मनात ठसावे असे मला देखील नेहमी वाटायचे ..गांधी जी मला तेव्हा मला क्रांतीचे शत्रू वाटायचे ....पण जेव्हा मी त्यांच्या नीतीचा जास्तीत जास्त विचार केला...तेव्हा मला त्यांच्या विचारांमधील खोलवर रुजलेली भावना कळली. मानवाच्या स्थायी भावाचा त्यांनी पुरेपूर विचार केला होता. आपल्या पेक्षा ताकदवर साम्राज्या पुढे किती काळ निभाव लागला असता ? याचा त्यांनी खूप अभ्यास केलेला दिसला. उपोषण हे अस्त्र नसून ते एक शास्त्र आहे हे खरेच आहे... गांधी जी नि स्वतः उपोषण केली....त्यामुळे इंग्रज सत्तेचे काही नुकसान नव्हते पण आपल्या साठी कोणी तरी आपले प्राण गमवायला तयार आहे हि भावना संपूर्ण भारत भर पसरली ......त्यामुळे संपूर्ण भारतात देशप्रेमाची एक लाट निर्माण झाली. एखाद्या गोष्टीत असहकार करणे हे देखील आंदोलनाचे भाग आहे. गांधी जी स्वतः उपाशी राहिले कि इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनात देखील संभ्रम निर्माण व्हायचा...कि आपल्या चुकीच्या वागण्यामुळे कोणी तरी उपाशी आहे.. हि अपराधी पणाची भावना हि त्यांना खिजवत रहायची मनात. कुठे तरी त्यांच्या हि मनात स्वतः बद्दल घृणा निर्माण व्हायची. मग उपोषणात ते एकाच वेळी किती तरी करून जायचे हे कळायला मला अण्णा हझारेंचे आंदोलन झाल्यावर कळले. सशत्र लढा हा एक क्रांतीचा भाग असू शकतो. फ्रेंच अमेरिकन राज्यक्रांती त्यानुसार झाली असेल पण भारताची क्रांती हि खरेच नाविन्यपूर्ण आहे ...क्रांती कोणतीही असो..त्यामध्ये शिरताना स्वताचे मृत्युपत्र जवळ ठेवून च निघायला हवे. जो माणूस मृत्यूला घाबरला तो क्रांतीची भाषा करू शकत नाही. क्रांती चे अनेक प्रकार पाहिले असतील सर्वांनी ....पण भारतीय राज्यक्रांती हि खरेच वेगळी आहे जगापेक्षा...इंग्रझांशी प्रत्यक्ष जमिनीवर लढणे खरेच सोपे नव्हते. या आधी त्यांनी खूप प्रयत्न केले देखील, पण त्यांचे अद्यावत शस्त्राते , विकसित युद्धनीती या पुढे हे अशक्य होते.....अशावेळी त्यांच्याशी लाध्ण्याकरिता काही तरी नवीन कल्पना काढणे खूप गरजेचे होते. अशावेळी अहिंसा हा मार्ग अवलंबला गेला. सुरुवातीला इंग्रजांना हे नवल च वाटले खरे. त्यांनी ते खूप ढिसाळ पणे घेतले.......हळू हळू त्या गोष्टीचे लोन संपूर्ण भारतात पसरले गेले. एक अशी वेळ येऊन गेली कि संपूर्ण भारत पेटला गेला त्या अहिंसक आंदोलना मूळे . ..मुळात एकदम सहज सोपा वाटणारा मार्ग खूप पुढे गेला होता. इंग्रजांच्या लक्षात च नाही आले कि संपूर्ण भारत कधी क्रांतीच्या ज्वालांनी पेटला. ती चूक त्यांना १९४२ च्या आंदोलनात जाणवली, एका बाजूला असहकार आणि दुसऱ्या बाजूला सुभास चंद्र बोस यांची विकसित सैन्य. इंग्रज पुरेसे हतबल झाले. अशा वेळी इंग्रजांनी या भारतातून काढता पाय घेतला.
स्वातंत्र नंतर या गोष्टीचा भारतीयांना च विसर पडला. उपोषण हे जाहिरात बाजीचे साधन झाले.फुकट प्रसिद्धी हवी असेल तर उपोषण करा असे भारतीयांना वाटू लागले.त्याच्या मागची सामार्थ्याशी त्यांना विसर पडली. काही वेळा काही चांगले प्रयत्न झाले पण उपोषण बद्दल सरकार हि उदासीन झाली. कोण उपोषण करते आहे याच्या कडे त्यांचा जाणीवपूर्वक कानाडोळा होऊ लागला....ज्याचे मन जिवंत आहे त्याच्या समोर हा उपोषणाचा मार्ग यशस्वी . नाही तर ज्याला दुसर्याच्या सुख दुखाची कदर च नाही त्याला काय कळणार उपोषण म्हणजे काय? पण तो व्यक्ती एक विसरतो. अहिंसक आंदोलनाला कधी हि हिंसक वळण लागू शकते....आणि ते इतके भयंकर असेल कि..त्याच्यातून सुटणे अशक्य आहे..जी गोष्ट इंग्रजांना कळली ती गोष्ट आताच्या राजकारणी लोकांना कळत नाही. खरे म्हणजे याचे मला जास्त दुखः वाटते..जेव्हा रक्त रंजीत क्रांती होते तेव्हा खूप काही गमवावे लागते. पण शेवटी विस्पोटा शिवाय पर्याय देखील शिल्लक नसतो.

Friday, January 8, 2010

घालमेल

एक कथा जगा वेगली पण तरी सत्य कथा नावे बदलून तुमच्या समोर सदर करणार आहे. ही कथा आहे दोन सामान्य मुलीची मध्यम वर्गातील एका मुलीची.
ही कथा आहे एका ज्योती ची एक जगावेगल व्यक्तीमत्वाची, स्वताचे नीयम पाळनार्या माणसाची। सल्ला मागायला येणार्या एका मुलीची ती कथा आहे. ही कथा लीहीत असताना मानत असंख्य वीचारानी वादल निर्माण केली होती पण यात मी वाट काढली आहे. ज्याना माज्या कथेबद्दल आतुँरता लागली असेल त्यानी जरुर मागुन घ्या कथा वाचायला. एक लेखक म्हणून मला जरुर आनंद मीलेल जर कोणाला अवदाली तर. आयुष्य नक्की काय असते याचा हा आलेख. मी आनी तुम्ही रोज आपण आपले जीवन असे का आहे? याचा वीचार करतो पण प्रश्नाची उत्तरे मात्र मीलत नाही आनी प्रश्न तसेच कायम राहतात.

Thursday, December 31, 2009

संतोष द ग्रेट मराठा

जेव्हा मी स्वताबद्दल काही लीहयाला जातो तेव्हा प्रशन पडतो की काय लीहयाचे? सर्व मनात दाटून आलेले असते, की हे लीहू की ते. मग वीचार येतो हे सर्व मी करतो आहे ते कशासाठी जर कोणाला जर भेटायचे असेल तर भेटा ना मी काही कोण असा vip मानुस नाही.माज्याबद्दल सांगायचे जले तर खुप काही आहे. पण तुमचा वेळ फुकट जाइल हल्ली वेळेला महत्व आहे. कोणाच्या मनात तरीसुधा प्रश्न पडले असतील तर माज्या दोस्तान्कडे चौकशी करावी आपला फ़क्त आपला सखा संतोष.
आपले आयुष्य कसे जगायचे याचे प्रत्येक माणसाचे स्वताचे असे एक मत असते, त्या प्रमाने तो ते जगत असतो. आपण मीत्र वा नातलग म्हणून फ़क्त सल्ला देऊ शकतो. चुकत असेल तर त्याला चुक दाखवून देऊ शकतो. पण इतके देखिल खरे आहे की आपन एखाद्या माणसाला खुप सम्जवन्याचा प्रयत्न करतो खरा पण तो समजुन घेत नाही, मग आपण तरी के करणार? ज्याला त्याला त्याचे आयुष्य जगायाचे असते, त्याने ते ठरवावे. आपन ही आपल्या चूका समजुन घ्यायाचा प्रयत्न करावा. हा मजकुर म्हणजे माज्या नवीन घालमेल कथा संग्रहाची एक ज़लक आहे. आयुष्य मी तया जगाच्या रचानाकाराला आनी आपल्या आई वडीलाना समरप्रीत करतो.