खूप दिवसांनी लिहायला आज बसलो खरा. पण पुन्हा सुरुवात कशी होईल याचा तणाव चेहऱ्यावर सतत जाणवत होता. लिहायला म्हटले कि खूप विचार करायचो असे कधी घडले नाही. जे मनात आले ते कागदावर उतरवत जायचे एवढेच येत असावे मला.विचारांना वाट करून देण्यासाठी लिखाण हा खरोखर चांगला प्रकार आहे. पण सर्वांच्या बाबतीत असे घडेल असे नाही. आणि मग सुरु होतो विचारांचे रणकंदन. आपण असेच का वागलो आणि असे का नाही घडले. हि नेहमीच न सुटणारी कोडी. ती सोडवण्याचा मग उगाच अट्टाहास सुरु होतो. आपण त्याच गोष्टींमध्ये इतके गुंततो कि आपल्याला आता त्यामधून बाहेर पडण्याचा मार्गाच दिसायचा बंद होतो. मग सुरु होतो प्रवास एका नकारार्थी. पण सगळे किती सहज शक्य होतो जर आपण आधीच हा गुंता सोडत गेलो तर. समस्या सोडवण्याचे तसे म्हटले दोन मार्ग. एक समस्या सोडवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करणे. अथवा तो प्रश्नावर विचार करणे सोडून देणे. वैचारिक गोष्टीवर दोन्ही गोष्टी समान वाटल्या तरी सामाजिक जीवनात इतके तटस्थ कधी रहाता येत नाही. म्हणूनच का होईना हे हेवेदावे हे प्रकार चालूच आहेत.
लहानपणी शाळेतून घरी येताना रस्त्यामध्ये खूप दुकाने होती. त्या दुकानासमोर पहिले की कित्येक आकर्षक गोष्टी मन विचलित करायच्या. वाटत राहायचे कि हि गोष्ट आपल्याला सुद्धा मिळावी. पण आर्थिक परिस्तिथी इतकी पण चांगली नव्हती. म्हणूनच का होईना आयुष्यातील चढउतार चांगली पहिली होती.असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीचा प्रभाव खरोखरच खूप मोठा आहे हे नंतर नंतर जाणवू लागले.प्रश्न हा आहे कि आपण जसे जसे वाढत जातो तश्या आपल्या गरजा सुद्धा बदलत जातात.आता पहा ना, लहानपणी अनेक मुले आईस्क्रीम साठी हट्ट करतात. मग ती मोठी झाली तरी तसेच वागतात का? लहानपणाच्या सवयी तश्याच राहतात का? लहानपणी मुलांच्या पालकांसमोर
जबाबदारी असतो तो त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याचा.
जबाबदारी म्हणता येणार नाही पण प्रश्न म्हटले तरी चालेल. लहानपणी आईवदिलानाकडून सायकल मागणारा मुलगा जसा मोठा होतो तसे बाईक मागतो. म्हणजे काय तर साइकल नंतर विसुरून जातो. तसेच असते आयुष्य सुद्धा. एखादी समस्या निपचित ठेवली ना तिची गरजच संपून जाते. म्हणजे एकच कि प्रश्न न मिटवताच तो सुटतो.
आयुष्य देखील असेच असते जे आपण म्हणतो आपल्याला सर्वात प्रिय आहे अशीच गोष्ट आपल्याला नंतर नकोशी होते. काही नात्याचे देखील असेच होत असावे. नुसता मायेचा ओलावा निघून गेल्यावर फक्त सोपोस्कार म्हणून पाळले जातात. दिसत असते या नात्यांना आता काही अर्थ उरला नाही तरी देखील आपण ती नाती उगाच कुरवाळत बसतो.नातीगोती या गोष्टी खरे म्हटले तर सहवासावर अवलंबून आहेत असेच मला वाटते. उगाच दूर फेकलेल्या नात्यांचा आपण उदो उदो करत बसतो. मी खूप वेळा असे पहिले आहे कि तो माझा मित्र आहे जो आता मंत्री आहे , असे सांगणारे खूप लोके मला भेटली. त्यांच्या सोबन मी त्यांना भेटायला गेलो सुद्धा . पण त्या मित्रांचे वागणे मला चमत्कारीत वाटले. जुन्या आठवणी बोलून नुसते भागत नसते. त्यांच्या चेहऱ्यावरील तिटकाराचा भाव मला स्पस्ट दिसत होता. पण ते भाव त्यांना का नाही दिसले हे मात्र मला कळले नाही. कि त्यांच्या त्या गरीब मित्राने स्वताचा मोठेपणा दाखवण्याकरिता तो भाव दुर्लक्षित केला असावा. असो आपण काय करणार? प्रेमप्रकरणांचा देखील असाच प्रवास घडत असावा.
विस्मरण हे खरे माणसाला मिळाले वरदान च म्हणावे लागेल. म्हणून च आपण प्रश्न च विसरतो. म्हणजे समस्या मितवन्याकरिता एक प्रश्न निपचित ठेवणे आणि त्यावर भाष्य न करणे हा पण एक समस्या सोडवण्याकरिता केलेला उपायच म्हणता येईल. प्रश्नांचे हे उकल शोधात आयुष्य निघून जाते. पण प्रश्न मात्र अधांतरीच पडून राहतो.
